आरपीडी महाविद्यालयात हिंदी कविता स्पर्धा : लिंगराज कॉलेजची गायत्री सिंग प्रथम

0

बेळगाव : प्रतिनिधी
येथील आरपीडी महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे आयोजित शकुन विजय आंतरमहाविद्यालयीन स्वरचित हिंदी कविता स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाच्या गायत्री सिंग हिने पहिले बक्षीस व ढाल मिळविली. आरपीडीच्या धनश्री खोराटे हिला दुसरे तर जैन कॉलेजच्या भक्ती चौधरी हिला तिसरे बक्षीस मिळाले. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा बेळगाव पदव्युत्तर केंद्राच्या मनीषा पाटील हिला विशेष पुरस्कार तर पुढील सहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. गौरी हलगेकर (बी के कॉलेज), रिझान मुल्ला (जैन कॉलेज), सायली मणेरीकर (मराठा मंडळ कॉलेज, खानापूर), नम्रता शरबाजी (बीके कॉलेज), लक्ष्मी ए. आर. (आर पी डी कॉलेज), नेहा मालाई (मराठा मंडळ कॉलेज, बेळगाव).
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजयकुमार हेडा उपस्थित होते. लखनौ येथील श्रीमती विजया कुमारी मौर्या ‘विजय’, मेरठ येथील श्रीमती सोनिया तायल या कवयित्रींनी आपल्या हिंदी कविता सादर करून विद्यार्थ्यांना कविता रचनेबद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर जयशंकर यादव यांनी दिवंगत कवयित्री शकुन विजय उर्फ शकुंतला हेडा यांच्या काव्यसाधनेबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अचला देसाई होत्या.
स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र पोवार यांनी केले. विजयकुमार हेडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैष्णवी काकतीकर हिने स्वागत गीत सादर केले. तर धनश्री व शिवानी यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक विजयकुमार पाटील यांनी आभार मानले. पदवी महाविद्यालयाच्या 42 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here