सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चक्क मंत्रालयातच ठिय्या आंदोलन

मंत्रालायत ठिय्या आंदोलन

0

मुंबई : मालाडच्या शांताराम तलाव जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांना ओंकार विकासकाने अपात्र घोषीत केल्याने त्यांना घरे मिळणार नाहीत. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधन्यासाठी या झोपडपट्टी रहिवाशांनी चक्क मंत्रालयात ठिय्या आोंदोलन केले. चार वर्षांपासून इमारतींचे बांधकाम सुरु आहे . एकूण सहा इमारतींपैकी तीन इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही विकासकाने शेकडो लोकांना अपात्र घोषित केले आहे . यावर नगरविकास विभाग आणि झोपू कार्यालयात खेटे मारूनही याबाबत योग्य दाखले मिळत नसल्याने थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलकांनी प्रथम गृहनिर्माण विभागाचे सचिव संजय कुमार यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ही भेट नाकारल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here