मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी

0

मुंबई-

मराठा समाजाच्या आरक्षणाला तूर्तास तरी काही अडकाठी येणार नाही.अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मराठा आरक्षणास स्थगिती द्यायला आज मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. पुढची सुनावणी १० डिसेंबरला होणार.

मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी

मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.

याआधी आघाडी सरकारनेही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्याने त्याला स्थगिती मिळाली होती. आता फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हे आरक्षणही कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरक्षणाविरोधात याचिका दाखल होण्याची हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यामुळे आरक्षणाविरोधातील याचिकेवर निर्णय देण्या आधी कोर्टाला विनोद पाटील यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here