हेमरसने चालू व गत हंगामातील एफआरपीसह बिले द्यावीत

स्वाभिमानीची मागणी ; कारखान्याला निवेदन

0

कोवाड : राजगोळी खुर्द( ता.चंदगड) येथील ओलम(हेमरस) साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामातील गाळप उसाला एकरकमी एफआरपी व गत हंगामातील ऊस बिलाची थकीत रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाकडे केली. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडयानवर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने कारखान्याचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन दिले.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन ४२ दिवस झाले तरी अद्याप गाळप उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत.
कायद्याने १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना अजूनही बिलाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. निवेदनावर राज्य सचिव राजेंद्र गड्यानवर, तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, विलास पाटील, शिवाजी भोगण, दत्तू बेळगावकर, रवींद्र पाटील, दत्तू बेनके, बी.एस. धुळाज, शिवगोंड पाटील, केदाना जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here