महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत – नारायण राणे

0

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन विभाग आयोजित कृषी, पशुपक्षी , मत्स्यव्यवसाय महोत्सवाचा शुभारंभ आज झाला.  सलग चौथ्या वर्षी आयोजित या महोत्सवामध्ये कृषी आणि उध्योगासह पर्यटनावर देखील भर देण्यात  आला. कुडाळ येथे आयोजित या महोत्सवाचे उदघाटन  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे असा विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी आणि पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी , कृषी आणि पशुसंवर्धन अधिकारी आणि पशुपालकांना उल्लेखनीय कार्यासाठी गौरवण्यात आले . याबरोबरच जिल्ह्यातील नऊ विभूतींना सिंधुरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये शाहिद लेफ्टनंट कर्नल मनीष कदम यांचे मातापिता , रुग्णसेवा, सामाजिक कार्य, कला, पत्रकारिता ,आदी क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्यांचा व्यक्तींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित करत असलेल्या अशा प्रकारचा महोत्सव राज्यातील सर्व जिल्ह्यात आता भरवले जाणार आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here