गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
बुधवारी सायंकाळी ५ वाजता अचानक मुसळधार पावसाने व विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धांदल उडाली. या पावसाचा ऊस हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परिसरातील ऊसतोड थांबली आहे.
या अवकाळी पावसाने ऐन हिवाळ्यात सायंकाळी स्वेटर घालायचे सोडून लोकांना छत्री आणि आडोश्याची जरुरी पडली. अचानक आलेल्या या पावसाने विद्यार्थ्यांसकट सर्वच घरी जाणाऱ्यांची अवस्था बिकट झाली.