तो दीड वर्षानंतर आला आणि घरात आईचा सांगाडा पहिला…..

0
Human Face Head Skull Bones Skull And Crossbones

उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये वृद्धेचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. आशा केदार साहनी (वय ६३) असं या वृद्धेचं नाव आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील वेल्सकॉड टॉवरमधील दहाव्या मजल्यावर त्या एकट्याच राहत होत्या. दीड वर्षानंतर अमेरिकेतून परतलेल्या या महिलेच्या मुलाला घरात आईचा सांगडा दिसला आणि ही घटना उघडकीस आली.

त्यांचा मुलगा रितुराज साहनी अमेरिकेत आयटी इंजिनियर असून कुटुंबासोबत तो अमेरिकेतच राहतो. तब्बल दीड वर्षांपासून रितुराज यांचे आपल्या आईशी बोलणे झाले नव्हते. शनिवारी रितुराज भारतात परतला. यावेळी तो लोखंडवालामध्ये आपल्या घरी गेला असता त्याला बेडवर आईचा सांगाडा दिसला. रितुराजने तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि सांगाडा शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला.दरम्यान हा मृत्यू आहे की आत्महत्या हे पोस्टमॉटर्म रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आशा यांनी एप्रिल २०१६मध्ये अखेरचा आपल्या मुलाला फोन केला होता. त्यांना फ्लॅटमध्ये एकटे राहायचे नव्हते त्यामुळे आपल्याला वृद्धाश्रमात ठेवावे असे त्याने आपल्या मुलाला फोनवरुन सांगितले होते. या महिलेचा मृत्यू भूक आणि अशक्तपणामुळे झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here