सामान्य जनतेसाठीच नेहमी कार्यरत : आ. मुश्रीफ

0

कागल (विष्णूपंत इंगवले) :

केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गोरगरिबाच्यासाठी राबवल्या. एकाही योजनेपासून कोणी वंचित राहिले नाही. स्व खासदार सदाशिवराव मंडलिक व मी सामान्य जनतेच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहिलो. येथून पुढेही सामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करित राहणार असल्याचे उद्गागार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. ते हासुर बु॥ (ता. कागल) येथील पाझर तलाव पाणी पूजन व विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिग्विजय पाटील होते.

आ. मुश्रीफ पुढे म्हणाले, वीस वर्षाच्या काळात आपल्या सर्वाचा आशीर्वाद मिळाला. त्यामुळे चिकोञा परिसराचा कायापालट करण्यात यशस्वी झालो. माताभगिनी जोपर्यत माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत माझे कोणीही वाईट करु शकणार नाही.

आमदार मुश्रीफांनी तालुक्याचा भौगोलिक विकास केला. सर्वसामान्यात मिसळणे हि त्यांची सवय आहे. ज्यांची कुवत नसताना वीस वर्षाचा परिपूर्ण राजकारणाचा अभ्यास असणार्‍या मुश्रीफांच्यावर बोलणार्‍यानी भान ठेवुन बोलावे. आपण बोलता किती. अनुभव तर कसलाच नाही. सर्वाचा आदर कराल तरच राजकारणात टिकाला. महिलांचा आपमान करणार्‍यांना कसले आलेत संस्कार अशी कडकडित टिका समरजितसिंह घाटगे याचे नाव न घेता पंचायत समिती माजी सदस्य शशिकांत खोत यांनी केली. यावेळी सरपंच दिग्विजय पाटील, उपसरपंच मनोज भास्कर, अंकुश पाटील, धनाजी कांटे, आप्पासाहेब तांबेकर, धनाजी तोरस्कर, शिवाजी भोसले, पुंडलिक पाटील, ज्ञानदेव सावंत आदी कार्यकर्ते, महिला उपस्थिती होत्या. प्रास्तविक गिरिश कुलकर्णी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here