‘त्या कुटुंबासाठी धावले आमदार मुश्रीफ कसरीपैकी माळवाडीतील जाधव कुटुंबाला मिळाला आधार

0

कागल : स्वतः अर्धांग वायूने लुळे होऊन घरी… कर्त्या मुलाचा चारवर्षापूर्वी ह्रदय विकाराने निधन…. त्यातच आठ दिवसापूर्वी दुसऱ्या मुलाचा पत्नीचा बाळंतपणात मृत्यू … असे आघातावर आघात पडलेल्या कागल तालुक्यातील कासारी पैकी माळवाडीतील मारुती धोंडिबा जाधव (वय ७०) यांच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. या कुटुंभाला सावरण्यासाठी कागलच्या आमदार हसन मुश्रीफ धावले. आमदार मुश्रीफ यांच्या हातात अवघ्या आठवड्याचे अगदी डोळेही न उघडलेली बाळ हाती देतच त्यांनाही गहिवरुन आले.
याबाबत अधिक माहिती अशी, जाधव यांच्या मोठ्या मुलाने वडिलांना घरच्या कामात हातभार लावण्यासाठी सेनापती कापशीत वडा-पावची गाडी सुरु केली. संदीप याचा चार वर्षांपूर्वीच ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे जाधव कुटूंबीय पार हादरून गेले. त्यांच्या मागे पत्नी वैशाली, चौथीत शिकणारा सुदर्शन आणि अंगणवाडीत जाणार संग्राम अशी दोन लहान मुले आहेत. मुलगा गेल्याच्या धक्काने या कुटुंबाचे एकमेव आधार आणि प्रमुख असलेल्या मारुती जाधव यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. तेही घरीच बसून आहेत. हा या कुटुंबावर दुसरा आघात होता. त्यांच्या या आजारपणात एक एकर जमीन विकावी लागली. अर्धा एकर जमीन हि घाण ठेवावी लागली. तरीही हे कुटुंब नियतीशी झुंज देत जगण्यासाठी धडपडत होते. लहान मुलगा दिलीप याने भावाचा वडापावचा गाडा सुरु केला होता. अशातच कुणाचाही ध्यानीमनी नसताना आठवड्यापूर्वी नियतीने या कुटुंबावर इतका क्रूर घाला घातला कि त्यांच्या दु:खाला सीमाच राहुल नाही. दिलीपच्या पत्नीचा बाळंतपणातच अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. एका सुंदर व गोंडस बाळाला जन्म देत पल्लवीने या जगाचा निरोप घेतला. त्यांना दोन वर्षाची वैदिका मुलगी आहे. हा या कुटुंबावरील तिसरा आघात सहन न होणार असाच….
कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही.
जाधव कुटुंबियांचे सांत्वन करताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘या कुटुंबाचा आता एकमेव आधार असलेल्या दिलीप याच्या नोकरीचा व्यवस्था आत करूच. स्वतःच्या आणि मृत भावाच्याही मुलांची आणि आई-वडिलांची काळजी दिलीपने घ्यावी एवढीच अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here