कष्ट, प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी या गुणांद्वारे यशस्वी व्हा:प्रा सुषमा पाटील

0

 

गडहिंग्लज : गुणवत्ता ही गरिबांच्या घरी पाणी भरत असते. या जगातील प्रत्येक व्यक्ती महान कार्य करण्यासाठी जन्माला आली आहे. यासाठी आपल्या अंतरंगातील सामर्थ्य ओळखून मिळालेल्या क्षेत्रात अत्युच्च पद मिळवा. त्यासाठी कठोर मेहनत, चिकाटी, सकारात्मतक वृत्ती, नाविण्याचा ध्यास यामुळे अशक्यप्राय गोष्टी मिळवता येतात. असे मत एम आर कॉलेज गडहिंग्लज च्या प्रा सुषमा पाटील यांनी काढले.

महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले या शाळेच्या ४९ व्या १०वी बॅचच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर, कल्पना चावला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महान विभुतींच्या जीवनात मरणप्राय संकटे अडचणी आली. पण त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे कार्य करून गेले. त्यामुळे परिस्थितीचा बाऊ न करता संकटाशी दोन हात करून आनंदाने जगा. आणि कितीही मोठे झाला तरी आपले आई वडील, गुरूजन व शाळेला विसरू नका….. व्यक्ती जवळ आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो हव्या त्या ठिकाणी विराजमान होता येते असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक पी. बी. बागडी यांनी काढले. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक के आर माने यांनी काढले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप केले. बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील मुलांना बक्षीस दिले. दोन विद्यार्थ्यांनीनी प्रशालेस पुस्तक भेट देऊन वाढदिवस साजरा केला त्यांना पुष्पगुच्छ आदर्श प्रशाला कोल्हापूर चे प्रयोगशाळा परिचर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ९वी व १०वी विद्यार्थी व वर्गशिक्षिका एस आय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी अतिशय भावपूर्ण व संगीतमय वातावरणात मुलींनी सुंदर स्वागतगीत व ईशस्तवन म्हटले. टी ए कुंभार यांच्या उत्कृष्ट फलकलेखनामुळे तजेलदारपण प्राप्त झाला. यावेळी संचालक पी जी पाटील, के पी बागडी, टी बी कांबळे, ए बी कोरे, एस एस पाटील, वाय पी पाटील, पी व्ही सुर्यवंशी बी बी भोई पी आर संकपाळ, अरूण पाटील, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते… सूत्रसंचालन एस एस जंगम व आभार एम एम देसाई यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here