हालशुगरकडून २३०० रुपये पहिली उचल

0

वार्ताहर निपाणी : निपाणी तालुक्यात सहकार तत्वावर चालविल्या जाणाऱ्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या उसाला २३०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचे उसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बिल जमा असल्याचे समजते. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात अजून एकही साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरु होऊन दोन महिने झाले तरी पहिली उचल जाहीर केलेली नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी उसपुरवठा करूनही आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकरी संघटनांनी याविषयी बेळगाव अधिवेशदरम्यान आंदोलन केले. यंदाच्या दर घोषणेसह थकबाकी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या आंदोलनाची दाखल घेत थकबाकी जमा करा अन्यथा कारवाई करू, असा इशाराही दिला. असे असताना कारखानदारांनी एकंदर दुर्लक्ष करत साखरेचा भाव हा विषय पुढे रेटण्याचा काम केले.
सध्या सर्वच शेतकऱ्यांचे पहिली उचल कधी जाहीर होऊन बिले कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते. हालशुगरने शेतकऱ्यांची होत असलेली अडचण इतर कारखाने किती पहिली उचल देणार याचा कानोसा घेत पहिली उचल २३०० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. पण याची कोठेही जाहीर घोषणा केलेली नसून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here