हाळलक्ष्मी आंगणवाडीला ‘निपसिड’ टिमची भेट

0

गडहिंग्लज : येथील हाळलक्ष्मी परिसरातील अंगणवाडीला राष्ट्रीय जण सहयोग एवं बालविकास संथ दिल्ली या संस्थेतील सदस्यांनी भेट दिली. एकात्मिक बालविकास प्रकल्प गडहिंग्लज अंतर्गत निपसिड कडून अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत मुलांचे पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर, स्तनदा माता लाभार्थी यांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा, पंतप्रधान जननी सेवा, ३ ते ६ वयोगटातील मुलांना शिक्षण, टीएचआर वाटप, आहार, नाष्टा, सजावट, मांडणी आदी बाबीची तपासणी केली. यावेळी बालविकास प्रकल्पाच्या सुपवायझर एस. डी. कोरवी, एस. के. पवार, के. एस. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. भक्ती येसरे, अंजना शिंदे, कुमूदिनी देसाई, प्रसाद बोंजाळे, वंदना साबळे आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here