बेरडवाडी-हलकर्णी रस्त्याच्या रुंदीकरनासाठी व वेळेत करण्यासाठी मनसेचे निवेदन

0

हलकर्णी : हलकर्णी-बेरडवाडी (राज्यमार्ग क्र. २०१) रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारून रुंद करण्याबाबत आज मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व तालुकाध्यक्ष शिवा मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनीक बांधकाम उपअभियंता(कोल्हापूर) यांना निवेदन देण्यात आले.
हलकर्णी-बेरडवाडी रस्त्याचे सध्या काम चालू आहे व हे काम निच्चत्तम दर्जाचे असून त्या कामाचा दर्जा सुधारण्यात यावा कारण या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते तसेच अवजड वाहनांची ऊस वाहतुकसुद्धा होत असते त्यामुळे दर्जा अभावी रस्ता वारंवार खराब होतो व सध्याचा रस्ता अरुंद असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढत चालले आहे आणि येत्या आठ दिवसात जर कामाचा दर्जा सुधारला नाही व रस्त्याचे रुंदीकरण वेळेत न झाल्यास मनसे आपल्या वतीने आक्रमक आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल.असे या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी अमित चौगुले, प्रभात साबळे व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here