नुलला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

0

वार्ताहर नूल :
पालकांनी आपल्या पाल्यांकडे साकारात्मरित्या पाहिल्यास मुलांचा सर्वागीण विकास होईल असे प्रतिपादन प्रा. सुषमा पाटील यांनी केले. नूल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रातीच्या पर्वावर आयोजित केलेल्या महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमास त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती शिंदे होत्या.
सुजाण पालकत्व या विषयावर व्याख्यान देताना प्रा. पाटील म्हणाल्या, मुलांना स्वतःवर स्वतःच्या कार्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला शिकवा. स्वतःच्या जबाबदाऱ्या, सदगुण अंगी बनवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन बनून मुलांवर संस्कार करावेत.
सुरुवातीला सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय संजय थोरात यांनी करून दिला. यावेळी प्रणाली काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्तीबद्दल प्रा. नंदप्रभा चव्हाण यांचा सत्कार झाला. तर हॉकी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल मोनिका आरबोळे, विद्या नगरे यांचा प्रा. सुषमा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उपसरपंच कल्लाप्पा देसाई, ग्रा. पं. सदस्य कविता पोवार, शैलेश्री मुत्नाळे, नफिसा खान, सुमित्रा देसाई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. संजीवनी मांजरेकर यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here