गारपीटग्रस्त शेतकऱ्यावर मंत्री दिवाकर रावते भडकले !

वाशिमच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर काढला राग

0

प्रतिनिधी- गणेश मोहळे

वाशिम : आपल्या तापट स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या मंत्री दिवाकर रावतेंनी आज पुन्हा वाशिमच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर आपला राग काढलाय. विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागातील नुकसानग्रस्त भागाला आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली. यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना एवढच विचारलाकि मंत्री साहेबांना “नुकसान १००% झालं, मात्र मदत काहीच मिळाली नाही” त्यावर रावते तक्रारकर्त्या शेतकऱ्यावरच भडकले.

यावेळी रावते म्हणाले, ”गारपीटग्रस्ताना मदत जाहीर झालीय ना, मग ती लगेच आजच्या आज मिळण्याची कशी काय अपेक्षा धरता ? मी आलोय ना तुमच्यासाठी इथे, मदतही मिळेल. उगीच तक्रार कशाला करता ? ”

दिवाकर रावतेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांमधूनही रावतेंच्या या दादागिरीविरोधात तीव्र नापसंती व्यक्त होतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here