छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन

0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, महापौर स्वाती यवलूजे, उपमहापौर सुनिल पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनीही छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रातांधिकारी सचिन इथापे, तहसिलदार उत्तम दिघे तसेच नागरिक व शिवप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. प्रारंभी नागाव फाटा येथे अपघात मृत्युमुखी पडलेल्या वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दोन मिनटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here