यशवंत रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयचे आज नेसरीत भव्य उद्घाटन

0

गडहिंग्लज प्रतिनिधी : युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यात विविध ठिकाणी ते भेट देणार आहेत यात ज्योतिर्लिंग शिक्षण समूह च्या नेसरी येथील यशवंत रेडेकर औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे आज त्यांच्या शुभहस्ते दुपारी साडे बारा वाजता उदघाटन होणार आहे.
शिवसेनेचे मुंबईचे नेते व एक कट्टर शिवसैनिक रियाजभाई शमनजी यांच्या अध्यक्षतेखाली २००६ पासून ज्योतिर्लिंग शिक्षण समूह नेसरीत कार्यरत आहेत, आता पर्यंत त्यांनी शिक्षण समूहातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आले आहेत. आणि त्यांच्या या कार्यास आतापर्यंत सर्वच ठिकाणी प्रोत्साहन भेटले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत मागील वर्षीच भारत सरकार व महाराष्ट्र सरकारमान्य यशवंत रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयची त्यांनी स्थापना केली आणि ह्या महाविद्यालयच्या नूतन इमारतीचे उदघाटन युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

युवानेते आदित्य ठाकरे यांची युवकांमधील क्रेज संपूर्ण महाराष्ट्रसह भारतात आहे आणि ते येणार म्हणजे न बोलता गर्दी ही होणारच तरी सर्वांनी आजच्या शुभकार्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन टीम न्युजटेल शी बोलताना त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here