ग्रामपंचायत निवडणुका जाहीर,आचारसंहिता लागू.

0

राज्यातील ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केल्याने आचारसंहिता लागू झाली आहे.

मुख्य म्हणजे यंदा पहिल्यांदाच थेट मतदारांना सरपंच निवडता येणार आहे

७ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची

नाशिक- १७०, धुळे- १०८, जळगाव- १३८, नंदुरबार- ५१, अहमदनगर- २०४, औरंगाबाद- २१२, बीड- ७०३, नांदेड- १७१, परभणी- १२६, उस्मानाबाद- १६५, जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९, अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३, वाशीम- २८७ आणि बुलडाणा- २८०, एकूण- ३,८८४

नामनिर्देशनपत्र दाखल करणे – १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१७

माघार- २७ सप्टेंबर २०१७

चिन्हवाटप- २७ सप्टेंबर २०१७

मतदान –७ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

मतमोजणी –९ ऑक्टोबर २०१७

 

१४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची

ठाणे- ४१, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग- ३२५, पुणे- २२१, सोलापूर- १९२, सातारा- ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६. एकूण- ३,६९२.

 

नामनिर्देशनपत्र दाखल करणे – २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१७

माघार- ५ ऑक्टोबर २०१७

चिन्हवाटप- ५ ऑक्टोबर २०१७

मतदान –१४ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

मतमोजणी –१६ ऑक्टोबर २०१७

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here