गडहिंग्लज मधील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्येसाठी शिवसेनेचे आगरप्रमुखना निवेदन

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) – गडहिंग्लज स्थानकातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी गडहिंग्लज शिवसेना उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली न्यू युवा मंच यांनी गडहिंग्लज आगरप्रमुख यांना आज निवेदन दिले.
गडहिंग्लज हे पहिल्यापासून केंद्रबिंदू आहे आजूबाजूच्या ३ तालुक्यामध्ये. गडहिंग्लज शहरात हॉस्पिटले, शासकीय कार्यालये,शाळा कॉलेजेस मोठ्या प्रमाणात असल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशी हे एस. टी. चा प्रवास करण्यासाठी गडहिंग्लज स्थानकात मोठ्या प्रमाणे गर्दी करतात. तर चालक व वाहक
प्रामाणिकपणे प्रवाशांना गावात वेळेत पोहचवण्याचे काम करत असतात तर त्यांना शासनाच्या नियमेप्रमाणे शौचालय, स्नानगृह, रेस्ट रूम या सुविधा प्रत्येक स्थानकात असतात पण गडहिंग्लज स्थानकात ह्या सर्व सुविधेमध्ये मोठ्या गैरसोयी आहेत.दरवाजे हे पान, गुटखा यांच्या पिचकारीमुळे रंगलेल्या आहेत, बाथरूम मध्ये नळांना तोट्या नाहीत,शौचालयात फरश्या फुटलेल्या आहेत,वॉश बेसिन मध्ये तोटी बंद होत नाही अश्या अनेक समस्या आहेत. आणि एस. टी. वाहन चालकांना व वाहकाना विश्रांतीची गरज असते व विश्रांती न भेटल्यास वाहन चालकाकडून एखादा अपघात होण्याची शक्यता असते.
गडहिंग्लज मधील चालक,वाहक व अन्य कर्मचाऱ्यांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.या सर्व समस्येवर ८ दिवसात निर्णय घेऊन त्वरित सुधारणा करण्यात यावी असे निवेदन शिवसेना व न्यू युवा मंच कडून आगरप्रमुख यांना देण्यात आले आणि तसे न घडल्यास आगरप्रमुखांच्या केबिन ला टाळे ठोकण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here