फसव्या जाहिराती कराव्या लागतात हे सरकारचे दुर्देव – खासदार सुप्रिया सुळे

सरकार स्वत:चीच जास्त जाहीरात करण्यात मग्न

0

प्रतिनिधी- अभयकुमार देशमुख

जळगाव- जाहीरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहीरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे असा अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसातील तेराव्या सभेत अमळनेर येथे सुळे बोलत होत्या.स्वच्छ अभियान हे संत गाडगेबाबांनी पहिल्यांदा सुरु केले आणि त्यानंतर महाराष्ट्रात स्वच्छता अभियान कुणी सुरु केले असेल तर ते स्वर्गीय आबांनी.मात्र आत्ता स्वच्छ भारत अभियान सुरु करुन मोदी स्वतं: क्रेडिट घेत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान मुंबईत  पार पडलेल्या मॅग्नेटिक कार्यक्रमावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमावर किती खर्च सरकारने केला आहे.कारण हा खर्च केलेला पैसा सर्वसामान्य जनतेचा असल्याने त्याची माहिती माहितीच्या अधिकारात घेणार असल्याचेही जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here