सर्वसामान्यांचे सुख व आनंदासाठी शासन प्रयत्नशील- चंद्रकांत पाटील

नुतन प्रशासकीय इमारतीतून लोकाभिमुख कामे करण्याचा आदेश

0

कोल्हापूर : जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादित मालाला दर, विविध आरोग्य योजना, विविध विमा योजना यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना सुखी करण्याचा शासन सातत्याने प्रयत्न करत असून जिल्हा व तालुकास्तरावरील विविध कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासकीय इमारती उभारण्यात येत आहेत. चंदगड येथील नुतन प्रशासकीय इमारत अत्यंत देखणी व सुसज्ज असून याठिकाणी काम करत असताना सामान्य माणसाला त्वरीत न्याय द्या, अधिकाधिक लोकाभिमुख कामे करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.चंदगड येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हे तालुक्याचे ठिकाण असून मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालये विविध ठिकाणी विखुरलेली व काही खाजगी इमारतीमध्ये भाड्याने होती. अनेक इमारती जुन्या ब्रिटीशकालीन व मोडकळीस आलेल्या होत्या. शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी सर्व तालुकास्तरीय शासकीय कार्यालये एकत्र आणण्याच्या दृष्टीने 7 कोटी 88 लाख रुपये खर्चून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या वेळेत व खर्चातही बचत होणार आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही इमारत अत्यंत प्रशस्त व देखणी आहे. याठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेतून लोकांची कामे तातडीने मार्गी लावावीत, त्यांना न्याय द्यावा व अधिकाधिक लोकाभिमुख काम करावे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here