खाजगी शाळांशी स्पर्धा संकट नव्हे तर प्रगतीची संधी: भैया माने प्राथमिक शिक्षक बँकेकडून विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा गुणगौरव

0

खाजगी शाळांशी स्पर्धा संकट नव्हे तर प्रगतीची संधी: भैया माने
प्राथमिक शिक्षक बँकेकडून विविध क्षेत्रातील यशस्वीतांचा गुणगौरव

मुरगूड प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेत सभासद शिक्षकांनी बँकेच्या भल्यासाठी सत्तांतर घडवले व विश्वासाने सत्तारूढ पॅनल कडे सत्ता दिली. त्या विश्वासास पात्र राहून संचालक मंडळाने सहकाराचा लौकिक वाढवत शिक्षक बँकेत उत्कर्ष साधला असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी काढले.
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा मुरगुड यांच्यावतीने आयोजित सेवा निवृत्त शिक्षक,स्वच्छ सुंदर हिरवी शाळा पुरस्कार,नवोदय प्रवेश,शिष्यवृत्ती, एसएससी,एचएससी परीक्षा यशस्वी विद्यार्थी,शिक्षक यांचा सत्कार व पारितोषिक वितरण संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज बापू पाटील होते.
आपल्या मनोगतात भैया माने म्हणाले “जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मध्यमवर्गास आर्थिक सक्षमता आली. उच्चशिक्षण आणि गुणवत्ता यामुळे क्षितिजे विस्तारली अशा स्थितीत स्पर्धाही वाढली.त्यामुळे शिक्षणासह सर्वच क्षेत्रात खासगी व्यवस्थेने आक्रमण केले. आता या स्पर्धेतून शासकीय व्यवस्थाही सुटणार नाहीत. स्पर्धेतुन अंग काढून घेण्यापेक्षा स्पर्धेसाठी सज्ज होणं अधिक योग्य ठरेल”.अध्यक्षीय मनोगतात युवराज पाटील यांनी बँकेने पारदर्शक कारभारामुळे शिक्षक सभासदांची मने जिंकली असून भविष्यातही सभासद याच आघाडीस पुन्हा संधी देतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संभाजी बापट, जि.प. सदस्य मनोज फराकटे,पं.स.सभापती राजश्री माने, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेब शेख,गटशिक्षण अधिकारी जी.बी. कळमकर यांची भाषणे झाली. स्वागत प्रास्ताविक संचालक जी एस पाटील यांनी केले सूत्रसंचालन विवेक गवळी तर आभार वसंतराव जाधव यांनी
मानले.कार्यक्रमास पं.स.उपसभापती विजयराव भोसले,सिद्राम पाटील, शिवानंद माळी,पं स सदस्य रमेश तोडकर,जयदीप पोवार,सूर्याजी घोरपडे,आबासो खराडे,पी के पाटील, रघुनाथ ढोले,शंकरराव इंगवले,वसंतराव जाधव,कावेरी चव्हाण,रेखा जाधव,सुरेखा पोवार,दस्तगिर फकीर, शिवाजी पाटील, प्रवीण आंगज, अरुण पाटील, उत्तम पाटील,डी.जी.पाटील,तुकाराम राजुगडे,बाजीराव साळस्कर पांडुरंग रावण, शाखाधिकारी आनंदराव वांगळे,तुकाराम राजुगडे,विलास पोवार, रंगराव भराडे आजी माजी शिक्षक व सभासद उपस्थित होते.

फोटो मुरगुड: दि प्राथमिक शिक्षक सह बँकेच्या विविध क्षेत्रातील यशस्वितांचा सत्कार प्रसंगी भैया माने,युवराज पाटील, जी.एस.पाटील, राजश्री माने,विजयराव भोसले आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here