गोवर्धन पशु वैदयकीय सेवेचा शुभारंभ म्हणजे दुसऱ्या धवल क्रांतीची सुरवात -डॉ. नितीन मार्कंडेय

0

 

सोलापूर: गोवर्धन पशु वैदयकीय सेवेचा शुभारंभ म्हणजे दुसऱ्या धवल क्रांतीची सुरवात ठरेल असे गौरवोदगार परभणीचे विभाग प्रमुख डॉ. नितीन मार्कंडेय यांनी काढले. सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे अत्याधुनिक गोवर्धन पशु वैदयकीय सेवेचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले या सेवेमध्ये समावेश असणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध तपासण्या यामध्ये जनावरांचे शारीरिक तापमान तपासणे, दात, घसा, कान यांची तपासणी, नियमितपणे होणारी रक्त आणि लघवी तपासणी, मस्टायसिस डिटेकट, मेटल डिटेकटर यामुळे पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे होणार आहे. प्राथमिक तपासण्या नियमितपणे झाल्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.साथीचे आजार आणि मस्टायसिस सारख्या इतर आजारावर वेळीच नियंत्रण करणे आता सोपे झाले आहे. जनावर आजारीच पडू नये याची काळजी घेतल्याने आणि त्याचा आहार आणि देखभाल शास्त्रशुद्ध पद्धतीने होणार असल्याने दूध उत्पादन देखील वाढणार आहे. या मधील कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणामुळे गाय किंवा म्हैस गाभ जाण्याची शक्यता आणि टक्केवारी निश्चितपणे वाढणार आहे. हि सेवा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल.

या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आणि महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले पशुधन हे भारतीय सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. असे असले तरी याबाबत शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यामुळे आणि पशुधनाच्या आरोग्याकडे गांभीर्याने पहिले जात नाही त्यामुळे हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. गोवर्धनच्या या अत्याधुनिक सेवेमुळे पशुधनाच्या आरोग्यासोबतच गुणवत्तापूर्ण आणि अधिक फॅट चे दूध उत्पादन घेता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर दूध व्यवसाय करता येईल. यामुळे पशुधनाच्या आरोग्यासोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुधारेल यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मयुरेश टेकनॉलॉजि चे संजीव गोखले यांनी यासेवेतील तंत्रज्ञानाची माहिती दिली. यावेळी गोवर्धनइंडिया डॉट. कॉम. या संकेत स्थळाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास निवृत्त सहा. आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. ए. पी. भोकरे, डॉ. हेमंत साळवे , प्रा. प्रदीपदादा सोळुंके, डॉ.डी.एस. सूर्यवंशी, डॉ. के.आर.सिंगल, लिमये सर इत्यादी मान्यवरांसह सुमारे २००० दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त उपायुक्त डॉ. एस.एल.शिंगारे, पशुधन व्यवस्थापक डॉ. व्ही.एस.शेट्ये आणि मयुरेश टेक्नॉलॉजीचे स्वप्नील गोखले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here