फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0

तर भीमसैनिक चोख उत्तर देतील :ना.आठवलेंचा राज ठाकरेंना ईशारा

गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती देशाच्या दुष्मनांशी लढावे . गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज
मनसेप्रमुख राज ठाकरेंना दिला आहे.
फेरीवालयांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दल ची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते . त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसे ने कायदा हातात घेऊ नये.मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नयेत . फेरीवाल्यांवर ज्या मन सैनिकांनी हल्ले केलेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआय चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा ईशारा ही ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.

हेमंत रणपिसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here