शहिद जवान तुपारे कुटुंबियांना मदतीसाठी आ. कुपेकर यांची मुख्यमंत्र्याना विनंती

0

चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथील शाहिद जवान राजेंद्र तुपारे यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शासनाकडून १५ लाखाची शासकीय मदत जाहीर केली होती. परंतु २ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुध्दा अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही. याची नोंद चंदगडच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी घेतली. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी मुख्यमंत्रीनी संबंधित विभागास तात्काळ मदत देणे बदलचे आदेश दिले. तसेच त्यांनी सूचित केले की आर्थिक मदतीची मर्यादा वाढवून देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तसेच आमदार श्रीमती कुपेकर यांच्या पाठपुराव्याने शाहिद तुपारे कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याच्या कामाला गती आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here