मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात मुलींना शिष्यवृत्तीच मिळालेली नाही…

0

वर्धा –  मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील मुलींना शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे वास्तव आज केळझर गावातील मुलींनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले. 

 वर्धा जिल्हयातल्या सेलू तालुक्यातील केळझर गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा आली असता इथल्या महाविदयालयीन विदयार्थींनीनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी महाविदयालयीन विदयार्थींनींनी वास्तव सांगितले. मिनल महाजन,शिवानी कोथळे,राजेश्री ढोरे या मुलींनी खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले की,गेल्या दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळत नसल्याने आम्ही गरीब मुलींनी शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचे पालक शेतकरी आहेत. त्यामुळे घरातील कामे करुन कॉलेजमध्ये जावून शिक्षण घ्यावे लागते. आम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती गेली दोन वर्ष मिळालेली नसल्याने आम्ही शिक्षण कसे पूर्ण करावे असा सवाल त्यांनी केला. फक्त कागदी दत्तक गाव आहे असा आरोप मुलींनी केला.

 मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या या गावात मुख्यमंत्री एकदाही आलेले नाही. खोटारडया सरकारचे आणखी एक उदाहरण आहे. या मुलांच्या चेहऱ्यावरील दु:ख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिसणार आणि या दु:खाची जाणीव कधीतरी या सरकारला होईल का ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी तुमची मोठी बहिण म्हणून स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या मुलींना दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here