गिजवणे – कडगाव मतदारसंघातील विकासकामांचा आज शुभारंभ

आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार प्रारंभ : सुमारे ४ कोटीची विविध विकासकामे

0

प्रतिनिधी गडहिंग्लज :
आमदार हसन मुश्रीफ खासदार वंदनाताई चव्हाण व जि.प. सदस्य सतीश पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवार दि. १२ रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी २ वाजता साधना माळ येथे हॉलचे उदघाटन होणार आहे. यानंतर बडयाचीवाडी हद्दीतील साधना कॉलनीतील कलावती मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (५ लाख), लिंगनूर का नूल येथील दलित वस्ती सुधार योजना (५ लाख), मातंग वस्ती येथील रस्ता करणे (४ लाख) कामाचा शुभारंभ, कडेगाव येथील सिद्धार्थनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण (२० लाख), कडगांव ते करंबळी रस्ता (आंबेओहोळ पाणंद) संरक्षण भिंत बांधणे (८ लाख ९० हजार), करंबळी येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (५ लाख), दलित वस्ती सुधार योजनेतून गटर बांधकाम (५ लाख), जनसुविधा अंतर्गत रस्ता डांबरीकरण (२ लाख), पवार गल्ली रस्ता काँक्रीटीकरण करणे (१ लाख), प्राथमिक विद्यामंदिर शाळा दुरुस्ती (१.४० लाख), मुख्य रस्ता कौलगे तिट्टा ते करंबळी गावापर्यंत (३९ लाख), कौलगे येथील सोसायटी गल्ली ते शहिद जवान उत्तम देसाई यांच्या घराकडे जाणारा रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (५ लाख), कौलगे ते ऐनापूर खडीकरण व डांबरीकरण (३४ लाख), ऐनापूर येथील जैन मंदिर बस्ती गल्ली रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५ लाख). अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५ लाख), ऐनापूर ते कौलगे जोडणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण (४० लाख), ऐनापूर तिट्टा ते ऐनापुरे गाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१० लाख), अत्याळ येथील नंदापाची वाडी ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण (२० लाख), बेळगुंदी येथील दलित वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (५ लाख),बसथांबा बेळगुंदी तिट्टा (२.५ लाख), बेघर वसाहत हरिजन वस्ती रस्ता व गटर्स (५ लाख), इंचनाळ येथील गणेश मंदिर सुशोभीकरण क वर्ग पर्यटनस्थळ विकास (२० लाख), गिजवणे येथील एस. टी. कॉलनीतील रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१० लाख), लक्ष्मी मंदिर रोड ते लिंगनूर तिट्टा रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१५ लाख), कुंभार गल्लीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५ लाख), विठ्ठल मंदिर पासून लिंगनूर तिट्याकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५८ लाख), गावतलाव सुशोभीकरण (२३ लाख), आनंदनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण (४ लाख), हरिजन वस्ती मूळ रस्ता करणे (६ लाख), लिंगनूरकडे जाणाऱ्या रस्तालगतच्या हरिजन वस्तीतील रस्ता करणे (२ लाख), केदारलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्तालगतच्या हरिजन वस्ती येथील रस्ता करणे (२ लाख), बेकनाळ लिंगनूर गणेश मंदिर सांस्कृतिक हॉल (५ लाख), लिंगनूर तिट्टा ते बेकनाळ गाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१५ लाख), जगतापवाडी रानातील हरीजन वस्ती रस्ता करणे (३ लाख) या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
या विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी जि.प. सदस्य सतीश पाटील प्रमुख उपस्थित राहणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here