भारताने पाकचे घुसखोरी करणारे एफ १६ लढाऊ विमान पाडले

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.

मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे.

नौशेरा भागात विमान कोसळले असून विमान कोसळत असताना एक पॅराशूटही दिसले. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here