चित्रपटातून समाजाला विचार मिळावा – सोहाब शेख

विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

0

कोल्हापूर : प्रतिनिधी चित्रपट घाईने करण्याचे माध्यम नाही. त्यासाठी नीट विचार करणे आवश्यक आहे. किंबहुना चित्रपटातून समाजाला विचार दिलेच पाहिजेत, अशी अपेक्षा माहितीपट तज्ज्ञ शोहाब शेख यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग तसेच एम. . मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी तिसर्यास्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन विद्यापीठाच्या निलांबरी हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

शेख म्हणाले, चित्रपटासाठी खूप सराव करावा लागतो. अनुभवी लोकांसोबत काम केल्याने नवी दृष्टी  येते. इंटरनेटसारख्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती जागतिक पातळीवर घेऊन जाता येणे शक्य झाले आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरचीही मोठी संधी आहे.

स्वागत व प्रास्ताविक वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी शैलेश कोरे दिग्दर्शितफांझरया लघुपटाचा यावेळी प्रिमियर शो दाखविण्यात आला.

स्पार्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये मल्हार जोशी (स्वीकार), आकाश बोकमुरकर (द क्वेश्चन), प्रत्युष कुलकर्णी (झाड), संदीप शिरगुप्पे (ठिबक सिंचन), स्नेहा पाटील (तमदलगेचा विकास), सोनम बाबर (जलसाक्षरता), संकेत शेडगे (द ड्युटी), रविराज कांबळे (ऊसासाठी ठिबक सिंचन), अजिंक्य देसाई (विजयदुर्गचा इतिहास), पूर्वा गोडसे (सम सॅडनेस ऑफ क्रिएशन), संतोष चव्हाण (महिला सक्षमीकरण आणि गोकुळ) या विद्यार्थ्यांनी माहितीपट आणि लघुपट सादर केले. विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या बी. जे. च्या सुनिल बिरेदार याचा तर, पदोन्नती मिळाल्याबद्दल सुधाकर बरगे यांचा शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सोनम बाबर आणि अविनाश सुर्वे यांनी केले. आभार डॉ. सुमेधा साळुंखे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here