खबरदार कोणी दादांवर यायचं नाही ….! कोणी केली आम मुश्रीफ यांच्यावर जहरी टीका….

0

राजे आणि मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा माणूस :समरजितसिंह घाटगे
आम.मुश्रीफ यांच्यावर जहरी टीका.

मुरगुड प्रतिनिधी
संजय मंडलिक यांची लढाई खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आहे.संजय मंडलिक यांना खासदार करण्याचे स्वप्न स्व.मंडलिक यांचे होते तर खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्तीला गाढण्याचं स्वप्नही त्यांचेच होते तुम्ही लोकसभेला सुरवात करा मी विधानसभेत संपवतो.पहिला सर्जिकल स्ट्राईक तुम्ही करा दुसरा मी विधानसभेत करतो असे आव्हान समरजितसिंह घाटगे यांनी दिले.

मुरगुड ता कागल येथे शिवसेना भाजप युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
कागलचे राममंदिर वर्गणीतून पूर्ण केले पण मुरगुडच्या अंबाबाईच्या मंदिराचे काम अजून रखडले आहे.का रखडले त्यातील राजकारणात मी जात नाही.चंद्रकांदादांना विनंती आहे त्यांनी या मंदिरास सव्वा कोटी रुपये निधी द्यावा.मंदिर बांधले की दादांना बोलवून अभिनंदन करायचे आणि कोणीही मंदिर माझ्यामुळे झाले असा खोटा शब्द काढायचा नाही.मंदिर बांधून त्यावर पावशेर ठेवण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाहीत.

राजे आणि मंडलिक साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आंबेओहोळ प्रकल्प मी पूर्ण करणार आहे पण चंद्रकांतदादा सही करत नाहीत अशी टीका करतो मग इतकी वर्षे जलसंपदा मंत्री असताना झोपा काढत होता का ? अशी टीका समरजितसिंह घाटगे यांनी आम हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. कोणीही दादांवर यायचं नाही त्यांच्यावर टीका करण्या अगोदर माझ्याशी भिडावे लागेल.

राजे आणि मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना प्रामाणिकपणे दगडे मारली आता राजे बाबा आणि मंडलिक गट नसर्गिक रीतीने एकत्र आला आहे आताच संधी आहे कागल मध्ये दणका द्या आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,प्रा संजय मंडलिक, संजय घाटगे अंबरीशसिंह घाटगे, विरेंद्र मंडलिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here