झेप अकॅडमीच्या वर्धापनदिनानिमित्त सामान्यज्ञान स्पर्धा

0

प्रतिनिधी गडहिंग्लज :
गडहिंग्लज व परिसरातील प्राध्यापक व व्यावसायिक यांनी एकत्र येऊन ज्ञानदीप प्रबोधिनी गडहिंग्लजला स्थापना केली आहे. या संस्थेचा उपक्रम म्हणून झेप अकॅडमी, या नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले आहे. या अकॅडमीच्या वर्धापनदिनानिमित्त २० जानेवारीला खुल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे.
झेप अकॅडमीचे उदघाटन विदेश व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते गतवर्षी करण्यात आले होते. या अकॅडमीमार्फत राज्यसेवा, दुय्य्म सेवा निरीक्षक, महाराष्ट्र गट क व कृषीसेवक, पोलीस भरती, सैन्यभरती आदी कोर्समध्ये सुमारे ८० विद्यार्थी शिकत आहेत. पाहील्याच वर्षी ५ विद्यार्थींची शासकीय सेवेत निवड झाली आहे. अकॅडमीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त व मेगा भरतीच्या अनुषंगाने २० जानेवारीला सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केल्या आहेत. परीक्षा १०० गुणांची असून डॉ. घाळी कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे. अधीक माहितीसाठी रवळनाथ को.ऑप. हौसिंग फायनान्सच्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड, नेसरी, निपाण, जयसिंगपूर, कोल्हापूर शाखेत संपर्क साधण्यात आवाहन केले आहे. यातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००० रु, ३००० रु, २००० रु आणि उतेजनार्थ बक्षीस म्हणून पाचव्या क्रमांकाला प्रत्येकी १ हजार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना २६ जानेवारीला प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते गडहिंग्लज येथील गळतगे ब्लड बँकेच्या सभागृहात बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष एम. एल. चौगुले, कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here