गौतम गंभीर भाजपातुन लोकसभा निवडणूक लढणार

0

 

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपप्रवेश केला आहे. गंभीर भाजपच्या तिकीटावर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत. परंतु गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. त्यामुळे यावेळी सातपैकी काही खासदारांना भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. या अडचणीवर पर्याय म्हणून भाजप नव्या उमेदवारांना संधी देऊ शकतं. त्यामुळे नवा उमेदवार म्हणून गंभीरला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गौतम गंभीरचा स्टार कॅम्पेनर म्हणून भाजप चांगलाच फायदा उचलेल.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात क्रिकेटमधून गंभीरने निवृती घेतली होती. आता तो राजकीय इनिंग सुरु करत आहे. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत आहे. यापूर्वी त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच तो वारंवार केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. तेंव्हापासून गंभीर राजकारणात प्रवेश करणार करण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आज अखेर गौतमने भाजपात प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here