गारगोटी पाटगाव रस्त्याची चाळण

0

गारगोटी (प्रतिनिधी) :
गारगोटी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या गारगोटी पाटगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरून पाटगाव धरण, रांगणा किल्ला, अथणी शुगर्स याकडे जावे लागते. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असल्याने या रस्त्यावरून दुचाकीधारकांना तारेवरची कसरत करावी लागते तर सद्या साखर कारखाण्याचा हंगाम चालू आहे. याच मार्गावरून अथणी शुगर्स कडे ट्रक, टॅक्टर वरून उसाची वाहतूक केली जाते.
रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी पाटगाव परिसर पाहण्यासाठी पर्यटकांना जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने पर्यटकातूनही नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने ह्या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब मुजवावेत अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here