आजर्‍यात गंगामाई वाचनालयच्या वतीने व्याख्यानमाला

0

आजरा (प्रतिनिधी) :
आजरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्रीमंत गंगाबाई वाचन मंदिर वतीने दि २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचा बुधवार (दि. २६) रोजी नामदेव माळी (सांगली) यांच्या ‘या सुखांनो’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे. गुरूवार (दि. २७) रोजी प्रा. पवनकुमार पाटील (सडोली खालसा) यांचे ‘चला देश घडवू या’ या विषयावर व्याखान होणार आहे. शुक्रवार (दि. २८) रोजी डाॅ. सुनील इनमदार (कोल्हापूर) यांचे ‘आयुर्वेद निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार (दि. २९) रोजी अॅड. राजकुमार पोतदार (सांगली) यांचे ‘कर्म’ या विषयावर व्याख्यान होईल. तर रविवार (दि. ३०) रोजी जयवंत आवटे (कुंडल) यांच्या कथाकथनाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.

सर्व कार्यक्रम वाचनालयाच्या मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृहात दररोज सायंकाळी ५. ४५ वा. सुरु होणार आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे अावाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रा. सुधीर मुंज, उपाध्यक्ष वामन सामंत, कार्यवाहक इराप्पा पाटील, सुभाष विभुते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here