गडहिंग्लज मॉनजिनिस केक शॉपितर्फे छत्रपती शिवाजी विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धा

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील नामवंत केक शॉपी मॉनजिनिस तर्फे काल (दि.९) रोजी छत्रपती शिवाजी विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मॉनजिनिस हे आपल्या व्यवसायासकट सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सदैव अग्रेसर असतात. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांसाठी केक डिझाइन स्पर्धेचे आयोज करण्यात आले होते. तशाच प्रकारे छत्रपती विद्यालयात भव्य अशा चित्रकला स्पर्धेचे आयोजण करण्यात आले होते. ह्यामध्ये विद्यार्थ्यांकडून देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ९०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी ह्या मध्ये सहभाग घेतला होता. ह्या मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मॉनजिनिस तर्फे केक आणि पेटीसचे वाटप करण्यात आले. ह्या स्पर्धेचा निकाल १६ मार्च रोजी घोषित करण्यात येणार आहे.

ह्यावेळी मॉनजिनिस केक गडहिंग्लज चे मालक श्री. संदीप शिंदे, मॉनजिनिस केक कोल्हापूरचे मार्केटिंग मॅनेजर श्री.प्रसन्ना इंगळे, छत्रपती विद्यालयचे शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here