गडहिंग्लज मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा वर बहिष्कार

0

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वचा विकास होण्यासाठी खेळ आणि कला महत्वाची असते .पण शासनाने 28 एप्रिल 2017 रोजी कला व शारीरिक शिक्षण विषयी च्या तासिका निम्याने कमी करून विद्यार्थी खेळाडू व शारीरिक शिक्षक यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे.याचा परिणाम विध्यार्थी खेळाडूच्या शारीरिक क्षमतेवर होणार असून भावी पिढीच्या दृष्टीने घातक आहे .
या निर्णयामुळे शाळेतील शिक्षकाची पदे धोक्यात आली असून त्यासाठी कला व शारीरिक शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेळोवेळी केलेल्या आंदोलनाकडे शासनाने दखल न घेतल्याने 2017 -2018 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कला व शारीरिक शिक्षण तासिकेचे परिपत्रक शासन मागे घेत नाही तो पर्यंत राज्यात केल्या जाणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा संयोजनाच्या सभेला शिक्षक हजर राहणार नाहीत . तसेच शालेय क्रीडा स्पर्धा वर संपूर्ण राज्यात बहिष्कार कायम राहील . प्रांताधिकारी यांना गडहिंग्लज तालुका स्पोर्टस टीचर्स असो. मार्फत देण्यात आले . या वेळे गडहिंग्लज तालुक्यातील शारीरिक व कला शिक्षक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here