गडहिंग्लजला दोन गटात हाणामारी

0

गडहिंग्लज  : गणपती उत्सवदरम्यान झालेल्या पूर्व वैमनसय्यावरून रविवारी गडहिंग्लजच्या चौकात युवकांमध्ये खुरप्याने झालेल्या हाणामारीत एक पोलिसासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
काल दुपारी मुख्य रस्त्यावर सव्वा चारच्या सुमारास मुसळे तिकटी चौकात ही घटना घडली. रविवारी दुपारी ऐन बाजारात हे थरारनाट्य घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ शहरात दशहतीचे वातावरण तयार झाले होते.
मागील गणपती उत्सवावेळी राहील खलिफ व प्रणित गाडीवड यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. आज पुन्हा तो विषय उकळून काढून वादावादी सुरू झाली. याच दरम्यान पोलीस राजू गाडीवड हे मध्यस्थी करायला गेले असता पुन्हा वाद चिघळला व बाजूलाच खुरपे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील खुरप्याने वार करण्यात आले. यानंतर वाद वाढत जाऊन दोन्ही गटातील समर्थक जमा झाल्याने मोठा गोंधळ उडाला.
प्रणिल हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. त्याने गणेशोत्सव कालावधीत शहरातील खड्डे मुजविताना आपला डंपर रस्त्यावरच उभारल्यामुळे वाद झाला होता व काल पुन्हा ह्याच वादाचे निम्मित काढून राहिलने आपल्या साथीदारांसह प्रणिलला संकेश्वर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मारहाण केली. यावेळी राहिलने प्रणिल व अमर यांच्यावर खुरप्याने वार केले. तसेच उमेशच्या डाव्या हातावर आनि पोलिस कॉन्स्टेबल गाडीवड यांच्या डाव्या खांद्यावर वार करण्यात आले.घटनेनंतर काही काळानंतर पोलिस कर्मचारी दाखल झाले.
या हल्ल्यात श्री गाडीवड यांच्यासह प्रणिल धोतरे, अमर शिंगाडे, उमेश पवार, राहील खलिफ, व जावेद शेख जखमी झाले आहेत. याप्रकरणी राहील खलिफ, अमन नदाफ, जावेद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी राहील खलिफ याचीही तक्रार दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अचानक झालेल्या या हल्ल्याने मात्र गडहिंग्लज बाजारात मोठी खळबळ उडाली होती. परिणामी गर्दी वाढल्याने संकेश्वर रोडसह कडगाव रोडवर वाहनांची लांबलचक रांग लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here