गडहिंग्लजचे ९ रस्ते सार्वजनिक बांधकाम कडे हस्तांतरीत करा

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ९ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरीत करावेत, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव ते हसूरसासगिरी, चिंचेवाडी ते नौकुड, महागाव – मासेवाडी – मुंगुरवाडी, हासुरवाडी – हिडदुगी – कडाल – मुंगुरवाडी, बटकणंगले ते जांभूळवडी, बटकणंगले ते हेब्बाळ – जलदयाळ, नेसरी – सावतवाडी – सरोळी – कुमारी रस्ता, हडलगे ते आमरोळी रस्ता, ऐनापुरे – सरोळी ते कोवाडे रस्ता असे. ९ रस्ते इजिमा दर्जाचे आहेत. या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. या रस्त्यांची देखभाल जिल्हा परिषदेकडून चांगल्या पध्द्तीने होत नाही. देखभाल दुरुस्तीसाठीही पुरेसा निधी शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त होत नाही. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. याबाबत परिसरातील नागरिकांच्या सातत्याने तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत सदरचे ९ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यास या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती चांगली होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही याबाबत मागणी केली आहे. त्यांनीही सदर रस्ते सार्वजनिक बांधकामकडे हस्तांतरित करावेत असे सुचविले आहे. जिल्हा परिषदेनेही याबाबत ठराव केला आहे. यामुळे ग्रामविकास विभागाकडून सदर रस्ते बांधकाम विभागाकडे गेल्यास सोय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here