गडहिंग्लजला मनसे वाहतूक सेनेची बैठक संपन्न

0

प्रतिनिधी गडहिंग्लज :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेची बैठक शुक्रवारी सकाळी हॉटेल जनाईमध्ये पार पडली. अध्यक्षस्थानी पक्षाचे उपाध्यक्ष व वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक होते. सुरुवातीला मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी स्वागत केले.
या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. नाईक म्हणाले, वाहतूक सेनेची सदस्य संख्या वाढविण्यासाठी सर्वानी प्रयन्त केले पाहिजेत. त्याचबरोबर वाहतूक सेनेच्या सदस्यांना एचपी कंपनीकडून सेवा, सुविधा आणि विमा उतरविण्याची माहिती यावेळी दिली. कागल, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदार संघात वाहतूक सेनेची सभासद संख्या वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बळ द्यावे तसेच कोल्हापूर जिल्हातील सर्व पदाधिकारी एकदिलाने पक्षासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, बाबुराव सनस, जगदीश खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस गडहिंग्लज तालुका अध्यक्ष शिवानंद मठपती, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष युवराज येडुरे, उपाध्यक्ष महेश देसाई, कागल तालुकाध्यक्ष संजय पाटील, आजरा तालुकाध्यक्ष अनिल नियुगरे, राधानगरी तालुकाध्यक्ष अशोक खोत, चंदगड तालुकाध्यक्ष राज सुभेदार, सत्वशील पाटील, अशोक पाटील, प्रभात सांबळे, आनंद घनटे, सतीश थवी यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आभार डॉ. धनंजय देसाई यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here