शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचा गडहिंग्लज मध्ये हद्दवाढ कृतीसमितीच्या वतीने सत्कार

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने हद्दवाढीसाठी सहकार्य केलेल्या व कृती समितीच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांचा कृती समिती व गडहिंग्लज नगरपरिषदच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेली अनेक वर्षे गडहिंग्लज शहर हद्दवाढीचा प्रश्न आता मिटलेला आहे आणि यामध्ये शिवसेनेची पण मोलाची साथ लाभली आणि विशेष सहकार्य लाभले ते शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची.
जिल्हाधिकारी कोल्हापूर व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना कृतीसमितीच्या वतीने हद्दवाढीसाठी बैठक घेऊन गडहिंग्लजकरांच्या भावना मांडल्या व तसेच जिल्हाधिकारी स्तरावर सर्व कागदपत्रकासाठी वेळोवेळी सहकार्य केल्या बद्दल विजय देवणे यांना कृती समितीच्या वतीने नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने,रियाजभाई शमनजी व शिवसैनिकांचे आभार मानण्यात आले.
या वेळी कृतीसमितीचे अध्यक्ष डाॅ.एम. एस. बेळगूद्री, निमंत्रक रमजानभाई अत्तार, कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे, रफिक पटेल, गणपतराव पाटोळे, सातापा कांबळे, बसवराज आजरी, दिलीप माने, रेखा पोतदार, अनंत पाटील, अमृतराव देसाई उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here