गडहिंग्लज तालुका क्रिडासंकुल अद्ययावत उभारणार : आमदार संध्यादेवी कुपेकर

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शासकीय विश्रामगृह गडहिंग्लज येथे गडहिंग्लज तालुका क्रिडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आ. संध्यादेवी कुपेकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत तालुका क्रिडा संकुल आराखड्यावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये आर्किटेक्ट प्रदिप गुरव यांनी तयार केलेल्या संकल्प चित्र आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या क्रिडा संकुलात ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, कबड्डी, खो-खो ग्राउंड, टेबल टेनिस हॉल, स्विमींग पुल, योगधाम इमारत, वॉर्मऑप ग्राउंड, क्रिडा क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मैदानी खेळांच्या सुविधांचा यामध्ये आहेत. यावेळी तातडीने या जागेवर संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण घालण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशा सुचना आमदारांनी दिलेल्या आहेत.
शासनाच्या नविन धोरणानुसार तालुका क्रिडा संकुलासाठी पाच कोटींचा निधी मिळण्याची शक्यता असल्याचे आ. कुपेकरांनी सांगितले. त्यामुळे या क्रिडा संकुलाची उभारणी अद्ययावत करून गडहिंग्लजच्या वैभवात भर पडण्यास मदत होणार आहे. या बैठकीनंतर आ. संध्यादेवी कुपेकर यांनी प्रत्यक्ष क्रिडा संकुलच्या जागेवर भेट दिली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे, सहाय्यक क्रिडा अधिकारी विकास माने, आर्किटेक् प्रदिप गुरव, अनिल पाटील, क्रिडा मार्गदर्शक सावंत सर, उपअभियंता देसाई, उदयराव जोशी आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here