खड्डेमुक्त रस्ते आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी गब्बर अॅक्शन कमिटीचे मनपासमोर आक्रोश निदर्शने

0

राजू म्हस्के

शहरातील रस्त्यांमधील खड्डे त्वरित बुजवून शहरवासीयांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ढिम्म आणि सुस्तावलेल्या महानगरपालिका प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर शुक्रवारी दुपारी तीप आक्रोश निदर्शने करण्यात आली. यावेळी वारंवार मागणीचे निवेदने देऊनही काहीच कार्यवाही न करणार्‍या सुस्तावलेल्या मनपा प्रशासनातील अधिकार्‍यांना बेशरमाचे झाड भेट देऊन अनोख्या पद्धतीने आणि मनपाच्या विरोधात धिक्कार घोषणा देऊन तीप निषेध नोंदवण्यात आला.याप्रसंगी गब्बर अॅक्शन कमिटीच्या रूद्रावतापुढे मनपा प्रशासनाच्या वतीने निदर्शनाला सामोरे जात मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उपायुक्त वसंत निकम यांनी मागणीचे निवेदन स्वीकारून प्रशासकीय पातळीवर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.लोकशाही पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने आम्ही मनपा प्रशासनास कामकाज सुधारण्याची विनंती अनेकदा केली. मागणीचे निवेदन देऊन मनपा प्रशासनास अवधीही दिला. परंतु निगरगठ्ठ आणि सुस्तावलेल्या मनपा प्रशासनावर याचा काही एक परिणाम झालेला दिसत नाही. आता आमचे पुढील आंदोलन हे अधिक तीप आणि गब्बर स्टाईलने असेल असा इशारा गब्बर अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here