गरीब कुटूंबातील जोडप्याचे मोफत लग्न लावून देण्याचा मनोदय : बळवंतराव माने

0

मुरगुड प्रतिनिधी –
लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात असे म्हणतात.पण माणुसकीची ओंजळ पुढे करून समाजातील रंजल्या – गांजल्याना मदत करण्यासाठी मातंग समाजातील एखाद्या गरीब जोडप्याचे मोफत लग्न लावून देण्याचा संघटनेचा मनोदय असल्याचे मत क्रांतीवीर फकीरा सेनेचे अध्यक्ष बळवंतराव माने यांनी व्यक्त केले. मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघटना व कोल्हापूर जिल्हा क्रांतीवीर फकीरा सेना यांच्यातर्फे विश्वनाथराव पाटील सभागृहात मातंग समाजाचा वधू वर सूचक पालक व विधवा,घटस्फोट युवक,युवतीसाठी महामेळावा उत्साहात पार पडला.त्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सर्जेराव अवघडे,शामराव शेंडगे,पॉल सोनुले,प्रकाश तिराळे – मळगेकर,संजय हेगडे,अनिल सिद्धेश्वर आदी प्रमुख उपस्थीत होते. सर्जेराव अवघडे म्हणाले,मातंग समाजाचा हा कागल तालुक्यातील पहिलाच मेळावा आहे.त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला,हा मेळावा समाजाच्या उन्नतीसाठी असेल. मेळाव्यासाठी कोल्हापूर,सांगली,सातारा, रत्नागिरी,गडहिंग्लज,कागल,गारगोटी, राधानगरी यासह अन्य ठिकाणाहून युवक – युवती आले होते.प्रसंगी अशोक पाटोळे,युवराज मोरे,प्रा.एकनाथ चौगुले,साताप्पा कांबळे,बाबासाहेब कागलकर, श्री.आयवाळे, विकेश किल्लेदार,बाबासो चांदणे,शामराव चांदणे,आदी उपस्थीत होते.

फोटो : मुरगूड : येथे मातंग समाजाच्या मेळाव्याचे दिपप्रजवलन करून उद्घाटन करताना बळवंतराव माने,सर्जेराव अवघडे,शामराव शेंडगे,पॉल सोनुले व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here