स्व.सुशिलादेवी आबीटकर हेल्थ फौंडेशन व केदारी रेडेकर फौंडेशन च्या संयुक्त विध्यमाणे गवसेत महा आरोग्य शिबीर संपन्न

0

आजरा (प्रतिनिधी) – गवसे(ता.आजरा) येथे शनिवार दिनांक ८ डिसेंबर रोजी मा.आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मातोश्री स्वर्गीय सुशिलादेवी आबिटकर हेल्थ फौंडेशन गारगोटी व केदारी रेडेकर फौंडेशन,तालुका आरोग्य विभाग आजरा यांच्या संयुक्य विध्यमाणे गवसे येथे मोफत आरोग्य व उपचार शिबीर संपन्न झाले.
यावेळी प्रा.अर्जुन आबिटकर सर,अनिरुद्ध रेडेकर,जितेंद्र टोपले,राजेंद्र सावंत,मंगुर मुजावर,संभाजी पाटील, गवसे सरपंच परीट मॅडम,दाभिल सरपंच दिपक गवळी,रणजित पाटील, देवराज मडभगत, तालुका आरोग्य अधिकारी खोत सर,संजय पाटील,विजय थोरवत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले की आरोग्य शिबीर घेण्या मागचा हेतू इतकाच होता की माझी आई स्व.सुशिलादेवी आबिटकर यांचा आजाराने मृत्यू झाला आणि कोणताही आजरा असणारी व्यक्ती जर कुटुंबात असेल तर काय हाल होतात याची आमच्या कुटुंबियांना जाणीव आहे आणि अशी वेळ कोणत्याही कुटुंबियांवर येऊ नये यासाठी हे आरोग्य उपचार मोफत ठेवून लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी हाच ध्यास मनी ठेवून आम्ही शिबीर आयोजित केले. ह्या आधीही आम्ही विविध योजनेमार्फत मोफत ऑपरेशन मुंबईहून करून आणली आहेत.मुख्यमंत्री योजनेतून पण अनेक गरीब कुटुंबियांना ऑपरेशनवरिल पैसे मिळवून दिले आहेत.या साठी मुंबई व कोल्हापूर या ठिकाणी २ व्यक्ती नेमल्या आहेत जेणेकरून लोकांना त्वरीत सुविधांचा लाभ घेता येईल व उपचार लवकर होतील.
शिबिरात स्त्री रोगतज्ञ,बालरोग तज्ञ,हृदयरोग तज्ञ,कान नाक घसा तज्ञ,नेत्रचिकित्सक,रक्त व लघवी तपासणी,मोफत औषधें इत्यादी सेवा देण्यात आल्या.ह्या सेवेचा एकूण ४६८ लोकांनी लाभ घेतला.
“आ.प्रकाश आबिटकर यांचे फौंडेशन मार्फत विविध योजनेतून मुख्यमंत्री सहायता निधी,महात्मा फुले आरोग्य योजना,आमदार शिबीर मार्फत मुंबईमध्ये मोफत ऑपरेशन अश्या विविध माध्यमातून आतापर्यंत योजना राबविण्यात आल्या”.
शिबिरात संचालक जितेंद्र टोपले व अनिरुद्ध रेडेकर यांची मनोगते झाली,सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले व आभार अश्विन डोंगरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here