एमआयएम नगरसेवकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

0

राजू म्हस्के

औरंगाबाद : शाहीन बाग, दिलरस काॅलोनी येथील रहिवासी वाहेद अली जाकीर अली हाशमी यांनी बुधवारी सिटी चौक पीलीस ठाण्यात MIM चे नगरसेवक जमीर अहमद कादरी यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांनी औरंगाबाद महानगरपालीकेच्या सन 2015 निवडणुकीत वार्ड क्र. 19 (आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी) या प्रभागातील उमेदवारीकरीता नामनिर्देशन पत्र भरतांना त्यासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांचे नावे औरंगाबाद महानगरपालीका हद्दीत भुमापन क्र .11255/1 येथील मकसुद कॉलनी मध्ये 13.94 चौ.मी.चे भुखंड असंताना त्याबाबतची माहीती जाणीवपुर्वक लपवली होती.    बनावट शपथपत्र तयार करुन फसवणुक करुन गैरकायदेशीर रित्या नगरसेवक पद मिळविले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरसेवक जमीर कादरी यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा तपास  फौजदार हरीष खटावकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here