पनुत्रेच्या दाम्पत्यामधील महिलेचा मृतदेह सापडला

0

 

कळे वार्ताहर: पनुत्रे ता.पन्हाळा येथील दाम्पत्याने रविवारी सकाळी ११:३०च्या दरम्यान गोठे-परखंदळे पुलावरून उडी टाकली होती.त्यादिवसापासुन व्हाइट आर्मिचे सहा-सात जवान त्यांच्या शोधात होते.आज नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता व्हाईट आर्मीने पुन्हा शोधकार्याला सुरवात केली.आज सकाळी साडे बाराच्या सुमारास कळे-मल्हारपेठ धरणाच्या नजिक त्या  दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह शोधन्यात व्हाइट आर्मिला यश आले.तब्बल ४८ तासानी हा मृतदेह सापडला असुन मृतदेहाची ओळख पटली आहे. व्हाइट आर्मी संबधित तरुणाचा पुन्हा शोध घेत आहेत. संबधित मृतदेहाचा पंचनामा कळे पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. जी. देसाई व त्यांचा स्टाफ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here