किल्ले रायगड प्लास्टिकमुक्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार – रामदास कदम

रामदास कदमांनी स्वच्छतेबद्दल केले अलिबागकरांचे कौतूक

0

अलिबाग :संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्र किनाऱ्या इतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे, या स्वच्छतेबद्दल मी अलिबागकरांचे कौतूक करतो अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अलिबागकरांचे कौतूक केले.

जिल्हाप्रशासनाने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यावर प्लास्टिक मुक्ती केली आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवून राज्यातील सर्व गड किल्ले प्लास्टिकमुक्त करु, अशी घोषणाही श्री. कदम यांनी केली. अलिबाग शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नगरपालिकेला डम्पिंग ग्राऊंड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासनही कदम यांनी दिले.

रामदास कदम यांच्या उपस्थितीत आज सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्याचे नियोजित होते. यावेळी रायगड प्रमाणेच राज्यातील अन्य किल्ल्यांवरही असाच उपक्रम राबवून राज्यातील सर्व गड किल्ले हे प्लास्टिक मुक्त करण्याचा मनोदय रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here