शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात हत्या

शिवसेनेचे माजी नगरसेवर अशोक सावंत यांची निर्घृण हत्या

0

मुंबईमधील कांदिवलीतल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवर अशोक सावंत यांची हत्या करण्यात आलीय. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्याण अशोक सावंत घरी जात असताना गाडीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला.

सावंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक सावंत यांच्या घराच्या काही अंतरावरच ही घटना घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

हल्ल्यामागे कोण आहे. अशोक सावंत यांची हत्या का करण्यात आली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा नोंद केला असून ते पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here