पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी दुपारी निधन झाले. त्रास होउ लागल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रभाग क्रमांक २२ मधून त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. पहिल्याच वेळी निवडून आल्यावर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी दिली.  सतत हसतमुख व सभागृहात नेहमी बोलण्यासाठी त्या पुढाकार घेत असत. महिला नगरसेवकांचे चांगले संघटन त्यांनी केले होते. त्यांच्या अचानक निधनाने महापालिकेतील राजकीय व प्रशासनालाही धक्का बसला आहे. खराडी येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळपासून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळली व त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here