चिमूर वनपरिक्षेत्रातील वाघाच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे वनमंत्र्यांकडून आदेश

भान्सुली वन बीटमध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेश

0

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीटमध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयातून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जखमी वाघावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असताना उपचार करण्यात आले नाही. तसेच ट्रॅक्युलायझेशनची परवानगी देण्यासाठी विलंब करण्यात आला या बाबी अतिशय गंभीर आहेत. वन विभागातर्फे व्याघ्र संवर्धन व संरक्षण या संदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असताना अशा घटना घडणे ही दुर्देवी बाब आहे. या प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे सचिव तसेच वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here